पुणे- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचा-यास कोरोना विषाणूची लागण झाल्याने, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी बोर्डातील अधिकारी आणि कर्मचारी यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांची केबिन वगळता इतर सर्व विभाग लॉक करण्यात आले आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणुचा कहर झाला आहे. बोर्ड प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करून कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी बोर्डाच्या गोळीबार मैदान येथे असलेल्या कार्यालयातील एका कर्मचा-याला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कार्यालयात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कर्मचा-याच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाचीच तपासणी करण्यात आली.
दरम्यान संबधित कर्मचा-यावर उपचार सुरू आहेत. तसेच संपूर्ण कार्यालयात औषधांची फवारणी करण्यात आली आहे. याबरोबरच संपूर्ण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना घरून काम करण्याच्या सूचना मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिका-यांची केबिन वगळता इतर सर्व विभाग लॉक करण्यात आले आहेत. बोर्डाच्या प्रशासकीय इमारतीत सध्या केवळ मुख्य कार्यकारी अधिका-यासह काही नगरसेवक कार्यालयात उपस्थित असतात