पिंपरी(प्रतिनिधी) – शहरातील 30 भाग हे प्रतिबंधित क्षेत्रातून (कन्टेन्मेंट झोन) आत्तापर्यंत बाहेर पडले आहेत. म्हणजे या भागात करोनाचे सक्रिय रुग्ण नाहीत. तर, सध्या 46 भागांमध्ये करोनाचे सक्रिय रुग्ण असल्याने संबंधित परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
करोनाचा समूह प्रसार रोखण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 19 ते 27 एप्रिल दरम्यान संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहराला कन्टेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केले होते.
त्यानंतर रुग्ण वाढीचा दर कमी झाल्याने सक्रिय रुग्ण असलेली 21 ठिकाणेच कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली. तथापि, ज्या भागात रुग्ण वाढतील तो भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जात आहे.
शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत करोनाचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या नवीन भागातही करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे कन्टेन्मेंट झोनमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शहरामध्ये 21 वरून दुपटीपेक्षा आधिक 46 कन्टेन्मेंट झोन झाले आहेत. तर, 30 भाग कन्टेन्मेंट झोनमधून बाहेर पडले आहेत. गुरुवार दुपारपर्यंतची (दि. 21) ही स्थिती होती. ज्या भागात रुग्ण सापडतील तो भाग कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जात आहे.
तर, कन्टेन्मेंट झोन जाहीर केलेल्या भागात सक्रिय रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित भाग कन्टेन्मेंट झोनमधून वगळला जात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
कन्टेन्मेंट झोनमधून बाहेर पडलेला भाग :
* कुंभार गल्ली-ओव्हाळ वस्ती-पुनावळे * ताथवडे चौक * जीवननगर-ताथवडे * खंडोबा माळ-भोसरी * पिंपळेसौदागर * नागेश्वरनगर-मोशी * शिवतेजनगर-थेरगाव * पडवळनगर-थेरगाव * गणराज कॉलनी * घरकुल-चिखली * गणेशनगर-दापोडी * क्रांतीवीरनगर-थेरगाव * पीएमटी चौक-भोसरी * बी.यू.भंडारी-दिघी * आदिनाथनगर-भोसरी * गुरूदत्त कॉलनी-भोसरी * रामराज प्लॅनेट-कासारवाडी * संभाजीनगर * शास्त्री चौक-भोसरी * रोडे हॉस्पिटल-दिघी * तनिष्क ऑर्किड-चऱ्होली * नेहरुनगर बस डेपो * कावेरीनगर पोलीस लाईन-वाकड * तपोवन मंदिर रोड-पिंपरी वाघेरे * 16 नंबर बसस्टॉप-थेरगाव * शिवाजी चौक-पिंपळेनिलख * तनिष्क आयकॉन-दिघी * गंधर्वनगरी-मोशी * विनायकनगर-पिंपळेगुरव * पिंपळेगुरव-जगताप कॉम्प्लेक्स.
कन्टेन्मेंट झोनमध्ये असलेला भाग : * खराळवाडी * शिवनेरी कॉलनी-पिंपळेगुरव * रुपीनगर * विजयनगर-दिघी * मधुबन सोसायटी-जुनी सांगवी * इंदिरानगर-चिंचवड * साठेनगर-चऱ्होली * शुभश्री रो हाऊस सोसायटी-पिंपळे सौदागर * बनकर वस्ती-मोशी * बजाज स्कूल परिसर-संभाजीनगर * न्यू एंजल्स स्कूल-तळवडे * वुडसविले-मोशी * काळेवाडी * मोहननगर * ताम्हणे वस्ती * तापकीर चौक * निकम वस्ती-चऱ्होली * लांडगेनगर * कस्पटे वस्ती-थेरगाव * दत्तनगर-थेरगाव * गुरुविहार सोसायटी-भोसरी * हुतात्मा चौक-भोसरी * छत्रपती चौक-रहाटणी * आनंदनगर-चिंचवडस्टेशन * चक्रपाणी वसाहत-भोसरी * पवनानगर-जुनी सांगवी * शुभश्री सीएचएस-आकुर्डी * विकासनगर-किवळे * तांबे शाळा-रहाटणी * फुगेवाडी * साई पॅराडाइज-पिंपळे सौदागर * पंचदुर्ग-रुपीनगर * कवडेनगर-पिंपळे गुरव * अम्ब्रेला बाग-संभाजीनगर * अमृतधारा-दिघी * मोरे वस्ती * भाटनगर * ज्ञानआंगण सोसायटी-रहाटणी * हनुमान कॉलनी-भोसरी * क्षितिज डेस्टिनेशन-भोसरी * अलंकापुरम रोड-भोसरी * सद्गुरू कॉलनी-वाकड * श्रीकृष्ण कॉलनी-रहाटणी * शरदनगर-चिखली * वाल्हेकरवाडी * आकाशराज हौसींग सोसायटी-रावेत.