पुणे – शहरातील सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेनमेंट झोन) संख्या मागील पंधरा दिवसात कमी झाली आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील कसबा पेठ येथे एक तर अन्य पाच झोन हे आंबेगाव, वानवडी, लोहगाव, फुरसुंगी आणि हडपसर या भागातील आहेत.
एकीकडे बाधित संख्या वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या कमी करण्यात येत आहे. त्यामुळे या वाढत्या संख्येमुळे पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होऊ शकते.
शहरात सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या दि. 4 नोव्हेंबरला 13 होती. तर, गेल्या 15 दिवसांत ही संख्या आठने कमी झाली आहे.
आता, शहर हद्दीतील कसबापेठेतील गाडगीळ पुतळा चौक ते जन्म-मृत्यू कार्यालय कसबा पेठ, नागझरी नाल्याने दक्षिणेस समर्थ पुलते फडके हौद ते लाल महाल चौक ते शिवाजी रस्त्याने रमामाधव चौक परिसर. आंबेगाव बुद्रुक सर्वे नंबर 16, वानवडी एस.आर.पी.एफ क्रमांक 1 आणि 2, नानावटीनगर. लोहगाव सर्वे नं. 296 पोरवाल रस्ता निंबाळकर कॉलनी, पार्क स्प्रिंग सोसायटी. फुरसुंगी सर्वे नं. 176, 177 भेकराईनगर, ढमाळवाडी परिसर आणि हडपसर ससाणेनगर सर्वे नं. 77, 79, 80, 311 मधील परिसर.