नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. सोनिया गांधी करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या घरीच आयसोलेटेड असून करोनाचे सर्व नियम पाळणार आहे. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घेण्याचा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली.
Congress President Smt.Sonia Gandhi has tested positive for Covid-19 today. She will remain in isolation as per Govt. protocol.
आज कांग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी का कोविड-19 टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आया है। वह सरकार द्वारा जारी प्रोटोकॉल का पालन करते हुए आइसोलेशन में रहेंगी।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) August 13, 2022
काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनाही कोविडची लागण झाली होती. सोनिया गांधी यांना यापूर्वी जून महिन्यातही कोविडची लागण झाली होती. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे तिला अनेक दिवस सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.