नवी दिल्ली : मनी लॉंड्रिंग प्रकरणातील तुरूंगात असलेले कॉंग्रेसचे नेते डी.के.शिवकुमार यांना भेटण्यासाठी गुरुवारी कॉंग्रेसचे अनेक दिग्गज नेते तिहार तुरुंगात दाखल झाले. कॉंग्रेस नेते सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) न्यायालयीन कोठडीत आहेत.
Delhi: Congress leaders Ahmed Patel, Anand Sharma and DK Suresh arrive at Tihar jail to meet Congress leader DK Shivakumar. He is currently lodged in the Jail under judicial custody of the Enforcement Directorate. pic.twitter.com/9rgHnRJPWv
— ANI (@ANI) September 26, 2019
गुरुवारी डीके शिवकुमार यांना भेटण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अहमद पटेल आणि आनंद शर्मा तुरूंगात आले होते. विशेष म्हणजे, ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात डीके शिवकुमारला अटक केली. यापूर्वी दिल्लीच्या न्यायालयाने शिवकुमार यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावल्याने शिवकुमार यांना मोठा धक्का बसला आहे.