नवसारी – गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात कॉंग्रेसच्या ( Congress ) प्रचार सभेसाठी जात असलेले कॉंग्रेसचे अदिवासी समाजाचे आमदार अनंत पटेल यांना भाजपच्या काहीं कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पटेल यांनी म्हटले आहे की, “आपण शनिवारी या जिल्ह्यातील खेरगाम येथे प्रचारासाठी जात असताना तेथील जिल्हा पंचायत प्रमुख आणि त्यांच्या गुंड समर्थकांनी आपल्या गाडीवर हल्ला केला.”
तसेच आपल्यालाही शिवीगाळ करून मारहाण केली. भाजपच्या विरोधात जो कोणी प्रचार करतो त्याला मारहाण केली जाते किंवा जेल मध्ये टाकले जाते. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती समजल्यानंतर कॉंग्रेस ( Congress ) कार्यकर्त्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. आणि त्यांनी संबंधीत गुंडांवर कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तीन दिवसांत संबंधीतांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. दरम्यान आमदारांच्या समर्थकांनीही त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केली त्यावेळी काँग्रेस कडूनही हिंसक प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे.