Congress Symbol । Lok Sabha Election : भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा सण सुरू झाला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. दावे आणि आरोपांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, तुम्हाला माहिती आहे का? काही बड्या राजकीय पक्षांच्या अशा कथा आहेत की, ज्या आज इतिहासजमा झाल्या आहेत.
आज आम्ही तुम्हाला ‘काँग्रेस’ पक्षाचे पहिले निवडणूक चिन्ह कोणते होते? इतकेच नव्हे तर निवडणूक आयोगाने यापूर्वी काँग्रेस पक्षाची जबाबदारी अन्य पक्षाकडे सोपवली होती. याबद्दल थोडी माहिती देणार आहोत.
मतदारांना सोपे जावे म्हणून बदलले निवडणूक चिन्हे – Congress Symbol । Lok Sabha Election
मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक चिन्हाचा वापर केला जातो, ज्याची व्यवस्था यापूर्वी लोकसभा निवडणुकीत निरक्षरतेमुळे करण्यात आली होती. यामुळे त्यांना विविध पक्ष आणि उमेदवारांमध्ये फरक करण्यास मदत होते. लोकसभेचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते.
निवडणूक चिन्ह देण्याची पद्धत त्यांनी 1951-52 मध्ये सुरू केली. त्यावेळी सर्व 14 राष्ट्रीय पक्षांना चिन्हे देण्यात आली होती. पहिल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चिन्ह ‘बैल जोडी’ होते. काँग्रेसने हे निवडणूक चिन्ह घेऊन प्रचार केला होता. आज काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘हाताचा पंजा’ असून, पूर्वी हे चिन्ह ‘फॉरवर्ड ब्लॉक पार्टी’चे असायचे.
पहिल्या लोकसभेपासून चौथ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसने ‘बैलांची जोडी’ या चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र 1967 नंतर काँग्रेसमध्ये दुफळी माजून सिंडिकेट आणि इंडिकेट असे दोन गट झाले. त्यानंतर 1969 साली निवडणूक आयोगाने ‘दोन बैलांची जोडी’ हे निवडणूक चिन्ह गोठवले.
त्यानंतर इंदिरा गांधी यांनी अनेकांशी सल्लामसलत करून अखेरीस हात हे निवडणूक चिन्ह निवडले. आणीबाणीनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा दुफळी माजली. त्यानंतर निवडणूक आयोगाने गाय वासरू हे निवडणूक चिन्ह गोठवून नवे निवडणूक चिन्ह निवडण्याची सूचना इंदिरा गांधी यांना केली.
आणीबाणीनंतरच्या धकाधकीच्या काळात इंदिरा गांधी तत्कालीन शंकराचार्य स्वामी चन्द्रशेखरेन्द्र सरस्वती यांच्या भेटीला गेल्या होत्या तेथे शंकराचार्यांनी आशीर्वादासाठी हात वर करून तेच निवडणूक चिन्ह ठेवण्याची सूचना इंदिराजींना केल्याचाही काही ठिकाणी उल्लेख आहे. । Congress Symbol । Lok Sabha Election
प्रत्येक पक्षासाठी स्वतंत्र मतपेट्या –
असे म्हटले जाते की, पहिल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षासाठी स्वतंत्र मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली होती, प्रत्येक मतपेटीवर त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह छापण्यात आले होते. पहिल्या निवडणुकीत 2 कोटी 12 लाख लोखंडी मतपेट्या आणि 62 कोटी मतपत्रिका छापण्यात आल्या होत्या.
भीतीमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे मतदार अनेकदा चुकीचे मतदान करताना दिसले. काही मतदारांनी मतपेटीत फुलांची पाने, नाणी, नोटाही टाकल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह देण्यात आले नव्हते. निवडणूक चिन्ह निवडताना पक्षाला ते सहज ओळखता येईल याची काळजी घ्यावी लागते. । Congress Symbol । Lok Sabha Election
हे देखील नक्की वाचा….