माध्यमांनी बंद दरवाज्यामागील काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीचे ‘पावित्र्य’ राखावे – काँग्रेस

नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पराभवाची कारणीमिमांसा करण्यासाठी काँग्रेसद्वारे तातडीने आपल्या कार्यकारणी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र बंद दरवाज्यातील या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, याबाबतच्या अनेक बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याने काँग्रेसतर्फे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसतर्फे आज एक अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलं असून काँग्रेसने माध्यमांना व जनतेला बंद दरवाज्यामागील चर्चेचे पावित्र्य राखण्याचे आवाहन केले आहे.

तत्पूर्वी, काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये काँग्रेस नेतृत्वाकडून पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांना खडसविण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.