स्टंट मास्टर ‘वीरू देवगण’ निधन

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण यांचे वडील स्टंट मास्टर ‘वीरू देवगण’ यांचे आज मुंबई मध्ये दीर्घ आजराने निधन झाले आहे. वीरू देवगण यांचे वय ८५ वर्ष होते. त्यांच्यावर मुंबईतील सांताक्रूझ येथील सूर्या रुग्णालयात उपचार सुरु होते. आणि उपचारादम्यानच आज सकाळी वीरू देवगण यांचे निधन झाले आहे.

वीरू देवगण हे बॉलिवूड मध्ये एक प्रसिद्ध स्टंट मास्टर होते. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. वीरू देवगण यांचावर विलेपार्ले पश्चिम येथील स्मशानभूमीत आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

https://twitter.com/ANI/status/1132936815374086144

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)