गुंतवणुकीत… डोन्ट बी अ ‘वायपर’ (भाग-१)

मित्रहो,

निवडणुकांचा, निकालांचा ‘Hang Over’ संपला असेल असे समजतो. आता घटकाभर समजा, राहुलजींची कॉग्रेस, नमोंचा भाजप, बहेनजींची बहुजन समाज पक्ष, अखिलेशची समाजवादी पार्टी आणि अन्य राजकीय पक्ष हे वेगवेगळे ’म्युच्युअल फंड्स’आहेत.आजच्या तेजीच्या वातावरणाने प्रभावित होवुन गुंतवणुकीच्या ईराद्याने आपण नेटवरुन एखादे लोकप्रिय आर्थिक संकेतस्थळ (Website) उघडता. तेव्हा आपल्याला या फंडसच्या ‘ताज्या कामगिरीचा’ लेखाजोखा  खालील प्रमाणे दिसेल.

(1) बहुजन समाजवादी पक्ष- आधीच्या जागा (NAV) 00 आत्ताच्या जागा 10 वाढ- अपरिमित % (2) जनता दल युनायटेड- आधीच्या जागा (NAV) 02. आत्ताच्या जागा 18  वाढ-  900% (3) भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस. आधीच्या जागा (NAV) 44..आत्ताच्या जागा 52. वाढ-  18.18% (4) भारतीय जनता पक्ष-आधीच्या जागा (NAV) 281..आत्ताच्या जागा 302  वाढ-  7.47% वगैरे  वगैरे.

आता खरे सांगा, वाढीचे हे दर पाहून येत्या काही काळांकरिता  सशक्त, फायदेशीर म्हणून आपण यांतील कोणता फंड  निवडाल? यापूर्वी अनेकदा सांगितलेली गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, किडुक-मिडुक आकडेवारीच्या आणि झापडबंद आकडेमोडीच्या मागे लागून आपण पर्याय निवडू, तर शुद्ध गणिती दृष्टिने बरोबर ठरुही, पण मग आपण उद्दीष्टाच्या  गादीवरील ‘सत्ताधारी’ नसू, लक्ष्य पुर्तीच्या ‘विरोधांत’ राहू !!

माहिती, ज्ञान आणि सारासार विवेक (Common Sense) ह्या वेगवेगळ्या  गोष्टी आहेत. अचुक नंबरचा चष्मा एखाद्याला अक्षरे, आकडे पहाण्याची शक्ती देईल, पण मजकूर वाचून त्याचा अर्थ लावणे याकरिता साक्षरतेची, ज्ञानाची आवश्यकता असते ना?

गुंतवणुकीत… डोन्ट बी अ ‘वायपर’ (भाग-२)

अशा वेबसाईट्स आपल्याला फारफारतर तपशीलवार, विस्तृत आणि अचुक माहिती देतीलही,  पण त्या माहितीचा वापर करताना ‘tomato is a fruit is Knowledge,  wisdom is NOT putting it in a fruit salad.’ हे तारतम्य  आपले आपल्यालाच वापरावे  लागेल. अशा संकेतस्थळांवर योजनांच्या तुलनात्मक कामागिरीबरोबरच योजनांच्या प्रवर्गानुरुप (Category)  उदा. लार्जकॅप्स, मल्टीकॅप्स ई असेही मुल्यांकन केलेले असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here