मुंबई – ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (GIS-23) संदर्भात 16 देशांमध्ये आयोजित केलेल्या रोड शोच्या यशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः देशांतर्गत रोड शोची जबाबदारी घेतील. 5 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान देशातील नऊ मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या या रोड शोची सुरुवात मुंबईतून होणार आहे. आणि यासाठीच सीएम योगी काल पासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर पोहोचले. उत्तर प्रदेशात उद्योग स्नेही वातावरण तयार व्हावं आणि गुंतवणूक वाढावी यासाठी योगींचा मुंबई दौरा आयोजित केलाय.
Mumbai | He (UP CM Yogi Adityanath) should develop businesses in UP instead of taking them from here. He should wear modern clothes instead of wearing saffron clothes as industry is a symbol of modernity: Congress leader Hussain Dalwai (04.01) pic.twitter.com/rZmZhSnGvt
— ANI (@ANI) January 5, 2023
योगींच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी हुसेन दलवाई यांनी योगींच्या भगव्या कपड्यांवर भाष्य केलंय. ते म्हणाले, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगव्या कपड्यांऐवजी आधुनिक कपडे घालावेत’. असं दलवाईंनी म्हटलंय. धर्माबद्दल दररोज बोलत जाऊ नका, भगवे कपडे घालू नका आणि थोडं आता आधुनिक व्हा, असा सल्ला दलवाईंनी यावेळी योगींना केला आहे.