नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलाद उन नबी निमित्त देशातील जनतेला शुभेच्छा संदेश दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या दिनीनिमित्त करुणा आणि बंधुत्वाची भावना आपल्या सर्वांमध्ये अधिक दृढ होत जाईल, असा मला विश्वास आहे.
प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून हा शुभेच्छा संदेश जारी केला आहे. सर्वांना ईद मुबारक असा संदेश देऊन पंतप्रधांनांनी या संदेशात सर्वांच्या आरोग्यदायी जीवनाची व कल्याणाची मनोकामना व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज संपूर्ण देशात हा ईदचा सण पारंपरिक उत्त्साहात साजरा करण्यात आला. अन्य धर्मीयांनीही मुस्लीम बांधवांना यानिमीत्त शुभेच्छा दिल्या.