नवी दिल्ली – दिल्ली विमानतळावर (Delhi Airpoert) शनिवारी सकाळी मुसळधार पाऊस (heavy rain) आणि खराब हवामानामुळे (bad weather) १८ विमाने अन्यत्र वळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जयपूर, लखनौ, अहमदाबाद आणि अमृतसरच्या दिशेने ही विमाने वळवण्यात आली आहेत. (Delhi Weather)
शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की विमानतळावर कमी दृष्यमानतेमुळे आवश्यक प्रक्रिया राबविण्यात आल्या. अशा परिस्थितीत विमानांच्या वाहतुकीत अडचणी निर्माण झाल्या. विमानतळावर धुक्यांमुळे मोठा अडथळा निर्माण झाला. (Delhi news)
दिल्लीत शनिवारी किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त होते. दिवसभर धुके राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दिल्लीत कमाल तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
Flight UK906 from Ahmedabad to Delhi has been diverted to Ahmedabad and flight UK954 from Mumbai to Delhi has been diverted to Jaipur due to bad weather and low visibility at Delhi airport: Vistara pic.twitter.com/DscwR9CjmA
— ANI (@ANI) December 2, 2023
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राजधानीत सापेक्ष आर्द्रता सकाळी ८.३० वाजता १०० टक्के नोंदवली गेली. त्यामुळे सर्वांनाच खराब हवेचा सामना करावा लागत आहे.ढगाळ आणि धुक्याच्या वातावरणामुळे विमान प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाल्याने प्रवाश्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.