Vaishali and Praggnanandhaa : महिला भारतीय बुद्धिबळ स्टार वैशाली रमेशबाबू तिसरी ग्रँडमास्टर ठरली. वैशालीने शुक्रवारी स्पेनमधील आयव्ही एल लोब्रेगॅट ओपनमध्ये 2500 FIDE (इंटरनॅशनल चेस फेडरेशन किंवा वर्ल्ड चेस फेडरेशन) रेटिंग मिळवून ग्रँडमास्टरचा किताब जिंकला. या विजेतेपदासह वैशाली आणि तिचा भाऊ भारतीय बुद्धिबळ स्टार रमेशबाबू प्रग्नानंदसह ग्रँडमास्टरचा किताब जिंकणारे जगातील पहिली बहीण-भावाची जोडी बनली आहे.
वैशालीने दुसऱ्या फेरीत तुर्कस्तानच्या एफएम टेमर तारिक सेल्बेस (2238) हिला रेटिंगमध्ये मागे सोडले. सलग दोन विजयांसह तिने स्पर्धेची सुरुवात केली. वैशालीपूर्वी कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांनी महिला ग्रँडमास्टरचे विजेतेपद पटकावले होते.
वैशाली चेस डॉट कॉल शी बोलताना म्हणाली, “जेतेपद मिळवल्यानंतर मला आनंद होत आहे. दोनच फेऱ्या झाल्या. मीही स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले होते. मी ग्रँडमास्टर किताबासाठी आनंदी आहे. जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली तेव्हा माझ्या मनात असलेले ध्येय मी अखेर साध्य केले. मी खूप जवळ होते, त्यामुळे मी खूप उत्साही होते पण थोडे दडपणही होते. माझा खेळ मध्यंतरी चांगला नव्हता, पण कसही करून मी शेवटी विजय मिळवलाच.”
Pro Kabaddi 2023 : प्रो-कबड्डी लीगचा थरार आजपासून; गुजरात जायंट्स व तेलगु टायटन्समध्ये सलामी…
दरम्यान, बुद्धिबळ खेळातील वैशालीचा प्रवास तिचा धाकटा भाऊ रमेशबाबू प्रज्ञानंद याच्याशी जोडलेला आहे. या भावांनी बुद्धिबळात सातत्याने यश संपादन केले आहे. या दोघांनी ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत दुहेरीत रौप्यपदकांसह अनेक पदके जिंकली आहेत.
वडिलांनीच दिले बुद्धिबळाचे प्रशिक्षण
वैशालीला बुद्धिबळ खेळाची ओळख तिच्या वडिलांनी करून दिली होती, जे स्वतः एक उत्कृष्ट बुद्धिबळपटू होते. वडिलांनीच वैशालीला खेळाची ओळख करून दिली. वयाच्या पाचव्या वर्षापासून तिच्या वडिलांनी तिला बुद्धिबळाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. वैशालीने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धाही जिंकल्या आहेत. अशाप्रकारे तिने ग्रँडमास्टर होण्यासाठी बराच प्रवास केला.