इंदापूर – भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची बीड येथे मंगळवारी (दि.16) भेट घेऊन सांत्वन केले.
शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षण लढ्यातील प्रमुख नेते माजी आमदार विनायकजी मेटे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. बीड येथील तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे, मुलगा आशुतोष मेटे, मुलगी आकांक्षा मेटे यांचे सांत्वन केले. गेली 25 वर्षातील विनायक मेटे यांच्या अनेक आठवणींना हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी उजाळा दिला.