हडपसर, दि. 16 (प्रतिनिधी) -हडपसर विधानसभा मतदारसंघात पुणे शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष अरविंद शिंदे व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वात आझादी गौरव पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. पदयात्रेची सुरुवात रामटेकडी येथे होऊन समारोप महात्मा गांधी चौक, हडपसर गाव येथे झाला.
यावेळी हडपसर विधानसभा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांतमामा तुपे, महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस अभिजित शिवरकर, पुणे शहर कॉंग्रेस सरचिटणीस विजय जाधव, दिलीप तुपे, नितीन आरू, गणेश फुलारे, खंडु लोंढे, ज्ञानेश्वर कांबळे, दिनेश गिरमे, शंभुशेठ जांभुळकर, वैभव डांगमाळी, बाळासाहेब हिंगणे, ऍड. राजशेखर गायकवाड, विजय राऊत, गणेश कवडे, प्रशांत जाधव, राजाअण्णा शिंदे, रहमान शेख, राजेंद्र मारणे, दीपक गुप्ता, महेंद्र तडके, शुभम कवडे, राजेंद्र मारणे, आनंद दुबे, महेश ननावरे यांच्यासह मोठ्या संख्येने कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. “स्वातंत्र्यात कॉंग्रेस पक्षाचं योगदान आज जनतेला पुन्हा सांगायची वेळ आली आहे.
कॉंग्रेसमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ज्यांच स्वातंत्र्यलढ्यात काडीचेही योगदान नाही, ज्यांनी स्वत:च्या मुख्यालयावर कधी तिरंगा फडकवला नाही, असे लोक आज देशप्रेमाचा इव्हेंट करत आहेत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी केले.