चिंबळी – खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या दक्षिण भागातील चिंबळी कुरुळी परिसरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या काकड आरती सांगता विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून मोठ्या आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कुरूळी (ता. खेड)येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या महिनाभरापासून सुरू करण्यात आलेली काकड आरती सांगता विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या वतीने ज्ञानोबा माऊली या जयघोषात, टाळमृदूगाच्या वाद्य गजरात दिंडी सोहळा आयोजित करून करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. प्रभू महाराज लांडे यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. महाप्रसादाने काकड आरतीची सांगता करण्यात आली.
यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ,विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिबळी येथील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या काकड आरती सांगता निमित्त पहाटे काकड आरती आयोजित करून ११ ते१ काल्याचे किर्तन व महाप्रसाद आयोजित करून काकड आरतीची सांगता करण्यात आली. तर पद्मावती नगर मध्ये सावता महाराज मंदिरात काकड आरती सांगता निमित्त पहाटे काकड आरती महापुजा आयोजित करून ११ते १ काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.
दुपारी २ते ४ पद्मावती भजनी मडाळाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पांडूरंग संत सावता महाराज प्रतिमेचे भव्य दिंडी मिरवणूक काढून महिला जेष्ठ नागरिक तरूण वर्ग यांच्यासाठी संगिता खुर्ची, फुगडी आदि कार्यक्रम आयोजित करून महाप्रसादाने काकड आरतीची सांगता करण्यात आली.
त्याचप्रमाणे मोई, निघोजे, केळगाव, मरकळ, सोळू, धानोरे, चऱ्होली खु, गोलेगाव परिसरात विविध भागांमध्ये काकड आरती सांगता काल्याच्या किर्तनाने व महाप्रसाद आयोजित करून मोठ्या आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ महीला व आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.