राजगुरुनगर (रामचंद्र सोनवणे) – खेड पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असुन गुरुवार दि.२ डिसेंबर रोजी निवडणुक होणार असल्याची माहिती पिठासीन अधिकारी तथा प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली. निवडणुक प्रक्रियेतील पंचायत समिती सदस्यांना पत्र देण्यात आली आहेत. २ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि निवडणुक प्रक्रीया राबवली जाणार आहे.
९ नोव्हेबरला ठरल्या प्रमाणे उपसभापती अमर काबंळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. उपसभापती पदावर यापुढे राष्ट्रवादी की शिवसेना यापैकी कोणत्या पक्षाचा उपसभापती होणार, कोणत्या सदस्य उपसभापती पदाच्या खुर्चीवर विराजमाब होणार? पुन्हा महानाट्य घडणार का? याची आता उलटसुलट चर्चा सुरु आहे.
पंचायत समितीमध्ये गेली सात आठ महिने सभापती पदाचे महानाट्य सुरू आहे. अविश्वास ठराव, मग सभापती निवडणूक पुन्हा उपसभापती निवडणूक आणि आता पुन्हा उपसभापती निवडणूक यामुळे तालुक्यात शिवसेना राट्रवादीमध्ये राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे पाच सदस्य राष्ट्रवादीला मिळाल्याने हे नाट्य रंगले आहे. येऊ घातलेल्या उपसभापती निवडणुकीत शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार का? हे या निवडणुकीवरुन समोर येणार आहे.
पंचायत समिती, जिल्हा परीषद निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागु होणार असल्याचे राजकीय अंदाज असल्याने सर्वाना संधी मिळावी म्हणुन गेल्या मे महिन्यापासून सुरु असलेले सत्ता नाट्याची अंतिम डाव आला आहे. २ डिसेंबरला होऊ घातलेल्या उपसभापतीच्या निवडीनंतर सभापती अरुण चौधरी यांच्या राजीनाम्याची चर्चा गेली काही दिवसांपासून सुरू आहे. निवडणूका लागणार असल्याने औट घटकेचा सभापती, उपसभापती ठरणार असल्याने ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चागंलीच चर्चा रंगु लागल्या आहेत.