मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांनी देखील मालिकांना जशास तसे उत्तर दिले आहे. अशातच आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे तापलेलं वातावरण थंड करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबतची माहिती देताना, “सध्याच्या द्वेषमूलक राजकीय वातावरणात, हे कूल गाणं ऐकून चिल-पिल घ्या” असा संदेश लिहिला आहे. याबाबतची पोस्ट लिहताना अमृता फडणवीस यांनी #Anniversary_Special असा हॅशटॅग देखील दिला आहे. अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच १७ नोव्हेंबरला पार पडला असून त्यानिमित्तानेच अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेली ही खास भेट आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी हे गाणं सोशल मीडिया सेन्सेशन ठरलेल्या ‘मनिके मागे हिते…’ या श्रीलंकन गाण्यावर आधारित असल्याचं सांगितलंय. अमृता फडणवीस यांनी गायलेल्या या गाण्याचे बोल “मन ही मन तुझे चाहा…” असे आहेत.
अमृता फडणवीसांचा रॅप अन् ठुमके
या गाण्यामध्ये केवळ अमृता फडणवीसांच्या गायनाचीच नव्हे तर रॅप व नृत्याविष्काराची देखील झलक पाहायला मिळाली आहे. मूळ हिंदीत असलेल्या या गाण्यात अमृता फडणवीस यांनी मराठी रॅपचा तडका दिला आहे. सोबतच या गाण्यात आपल्यातील नृत्य कलागुणांची झलक देखील दाखवली आहे.
Admist the ongoing Heated Political Times,
take a Chill Pill with this Kool song !Lyrics by – Dev#AnniversarySpecial
Inspired by #ManikeMageHithe of Internet sensation #Yohani#HindiVersionOfManikeMageHithe pic.twitter.com/ibEazo7gUH— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 19, 2021