टाकवे बुद्रुक – आपल्या मेहनतीवर विश्वास असेल तर यश नक्की मिळते. यांचे उत्तम उदाहरण टाकवे गावात दिसून आले. टाकवे येथील शुभम विलास लोंढे व संतोष विलास लोंढे या दोन सख्ख्या भावांनी पोलीस भरतीमध्ये यश संपादन करून आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले. मावळवासीयांकडून लोंढे बांधवांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
आपली दोन्ही मुले पोलीस झाल्याने आईवडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. लोंढे कुटुंबाची परिस्थिती सामान्य असून वडील विलास लोंढे आपला लॉण्ड्रीचा पारंपरिक व्यवसाय सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावत आहेत. तर आई अरुणा लोंढे देखील घरातील कामासह व्यवसाय सांभाळण्यासाठी हातभार लावत आहेत.
बिहरीलाल दुबे व आनंदराव जांभूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष आणि शुभमनी यांनी पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेतले. दोन्ही सख्ख्या भावांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.