दिल्ली : नागरिकांत संशोधन कायद्या विरोधी आंदोलनात भडकाऊ भाषण दिल्याप्रकरणी सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वड्रा आणि अखिल भारतीय मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याविरूद्ध नागरिकता दुरुस्ती कायद्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एएनआयच्या वृत्तसंस्थेच्या माहिती नुसार, तिन्ही जणांवर सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत भडकाऊ भाषणे केल्याचा आरोप आहे. कोर्टाने तक्रारीवरील सुनावणीसाठी 24 जानेवारी 2020 ची तारीख निश्चित केली आहे.
या प्रकरणात प्रदीप गुप्ता नावाच्या वकिलाने उत्तर प्रदेशमधील अलिगड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सोनिया गांधी, प्रियांका गांधी-वड्रा, ओवैसी यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तीन नेत्यांसह पत्रकार रवीशकुमार यांचेही नाव आहे.