पोलीस आणी गुन्हे शाखेची पथके रवाना ; मंगळवारी रात्री मुंढव्यात घडली घटना
पुणे: मुंढवा परिसरातील एका हॉटेलमधून मध्यरात्री जेवण करुन घरी जात असलेल्या परदेशी महिलेला दुचाकीवरुन सोडण्याची बतावणी करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली. निर्जन भागात महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिला मुख्य रस्त्यावर सोडून दुचाकीस्वार आरोपी आणि त्याच्या बरोबर असलेला एक साथीदार पसार झाला. विमानतळ पोलीस आणी गुन्हे शाखेची पथके गुन्हेगारांच्या मागावर
याबाबत महिलेने विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची युगांडात आहे. सोमवारी सायंकाळी ती मुंढवा भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. जेवण झाल्यानंतर मध्यरात्रीबाराच्या सुमारास ती हॉटेलमधून बाहेर पडली. घरी जाण्यासाठी ती मोटारीची वाट पाहत थांबली होती. ऍपआधारित मोटार सेवा देणाऱ्या कंपनीच्या चालकाशी तिने संपर्क साधला होता.
त्याचवेळी पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरुन एकजण तेथे आला. त्याने इंग्रजी तिच्याबरोबर संवाद साधला आणि घरापर्यंत सोडतो, अशी बतावणी केली. त्यानंतर महिला दुचाकीवरुन त्याच्याबरोबर निघाली. दरम्यान दुचाकीस्वाराने एकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याचा मित्र काही वेळानंतर तेथे आला. दरम्यान, दुचाकीस्वार आणि त्याच्या बरोबर असलेला साथीदार दुसऱ्या दिशेने जात असल्याचे निदर्शना आल्यानंतर तिने त्यांच्याकडे विचारणा केली. तिने दुचाकी थांबविण्याची विनंती केली. विमाननगर ते लोहगाव रस्त्यावर असलेल्या निर्जन जागेवर महिलेला दोघेजण घेऊन गेले. धमकावून तिच्यावर अत्याचार केले. घाबरलेल्या महिलेने दोघांना हमरस्त्यावर सोडण्याची विनंती केली. त्यावेळी तेथून काहीजण जात होते. महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. तेव्हा दुचाकीस्वार आरोपी आणि साथीदार महिलेला रस्त्यावर सोडून पसार झाले.
घाबरलेल्या महिलेने विमाननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, विमाननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. तक्रारदार महिला ऑगस्ट महिन्यात देशात प्रवासी व्हिस्सावर आली आहे.
मारहाण करुन केला बलात्कार
मुंढवा येथील एजंट जॅक्स हॉटेलमधून जेवण करुन बाहेर पडल्यावर ऍपवरुन वाहन बुक करत असताना दुचाकीस्वाराने लिफ्ट देण्याचा बहाणा केला.त्याला होकार देऊन बाईकवर बसताच त्याने मोबाईलवरुन मित्राला बोलावून घेतले. यानंतर संबंधीत तरुणी दोघांच्यामध्ये बसून निघाली असता तीने मोबाईलवर घराचे लोकेशन इतरत्र ठिकाणी दिसलले. तीने आरोपींस दुचाकी थांबण्यास सांगितले असता गाडी जोरात पळवून निर्जन स्थळी नेण्यात आली. काहीतरी अघडीत घडणार असल्याची कल्पना येताच तीने आरडा ओरडा केला. यामुळे दोघाही आरोपींनी तीला मारहाण करत कपडे काढून बलात्कार केला. यानंतर दोघे आरोपी निघुन जात असताना तीने मुख्य रस्त्यापर्यंत सोडण्याची विनंती केली. त्या दोघांनी परतमध्ये बसवून मुख्य रस्त्यापर्यंत आणले. तेथे काही मुले उभी होती, त्यांना बघून तीने मदतीसाठी आरडा ओरडा केली. मुले जवळ येत असल्याचे पहाताच दुचाकीचा तोल जाऊन तीघेही पडले. यानंतर आरोपी दोघेही आरोपी दुचाकी घेऊन पळून गेले. दरम्यान तेथे गस्तीवरील पोलिसही दाखल झाले होते.