मुंबई – आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे समालोचन करत असलेला धवल कुलकर्णी हा अनुभवी वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा खेळाडू बनून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
यंदाच्या मोसमात मुंबईने सलग आठ पराभव पत्करले होते. त्यांनी एक सामना जिंकून आता उरलेल्या सामन्यांसाठी संघात काही बदल केले आहेत. त्यामुळेच त्यांनी विशेष राखीव नियमाचा लाभ घेत धवलला संघात पाचारण केले आहे.
तो लवकरच सरावाला सुरूवात करणार आहे. धवल समालोचन करत होता. आता तो संघात दाखल झाला असून सरावालाही त्याने प्रारंभ केला आहे. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह व जयदेव उनाडकट यांना सातत्याने अपयश येत असल्याने मुंबईने धवलला बोलावले.