चिंबळी -मेदनकरवाडी (चाकण, ता. खेड) येथील खंडोबा ते बापदेव मंदिर रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी सरपंच अमित मेदनकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या रस्त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून तत्कालीन पालकमंत्री गिरीज बापट यांनी 5 लाख तर 14 वा वित्त आयोग निधीतून 6 लाख असे 11 लाख रुपये देण्यात आले आहे.
दरम्यान, खंडोबा मंदिराला “क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी सरपंच रामदास मेदनकर यांनी सांगितले.
या शुभारंभाप्रसंगी उपसरपंच दीपिका गोरे, ग्रामपंचायत सदस्य नंदाराम भुजबळ, जगदीश मेदनकर, सदीप मेदनकर, सुभाष भुजबळ, पांडुरंग कांबळे, शिवाजी भुजबळ, ठेकेदार हर्षल जाधव, पांडुरंग लष्करे आदी मान्यवर उपस्थित होते.