पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबागेत चायना माल विक्रीवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय तुळशीबाग व्यापारी संघटनेने घेतला आहे.
पुण्यातील लोकप्रिय अशी बाजापेठ म्हणजे तुळशीबाग. तुळशीबागेत जवळपास ३०० दुकाने आहेत. भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहिद झाले. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे.
चीन ला धडा शिकवण्यासाठी देशातील नागरिक आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी चिनी वस्तूंची होळी करून निषेध केला जात आहे. त्यातच आता पुण्यातील तुळशीबाग व्यापारी संघाने देखील यापुढे चिनी बनावटीच्या वस्तू न विकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिन्याभरात चिनी बनावटीचा माल तुळशीबागेतून हद्दपार होईल तसेच ग्राहकांनी देखील चिनी मालावर बहिष्कार घालाव असे आवाहन करण्यात आले आहे. इथून पुढे तुळशीबागेमधील कोणताही व्यापारी माल संपल्यावर चिनी बनावटीचा माल मागविणार नाही असेही सांगण्यात आले आहे.