कॉमेडियन सुगंधा मिश्रा हिचे अलीकडेच डॉक्टर संकेत भोसले बरोबर लग्न झाले आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला जेमतेम 10 दिवस झाले असतील पण या लग्न समारंभामुळे सुगंधा मिश्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुगंधा आणि संकेत यांच्या लग्नामध्ये करोना नियमांचा भंग झाला असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. निर्बंध असतानाही त्यांच्या लग्नात बरेच लोक आले होते, असा आरोप आहे.
त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुगंधा बरोबरच हॉटेलच्या मॅनेजमेंट विरोधात देखील खटला भरला गेला आहे. मात्र अजून कोणालाही अटक झालेली नाही. विवाह समारंभात 100 पेक्षा जास्ती लोक आले होते. मात्र केवळ 40 लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी देण्यात आलेली होती.
लग्नाच्या अगोदर 24 तास सर्व नातेवाईकांना कॉरंटाईन व्हावे लागले होते. सुगंधा मिश्राच्या लग्नामध्ये कोणी सेलिब्रिटी आले नव्हते. मात्र त्यांच्या लग्नाची सोशल मिडीयावर खूप चर्चा झाली होती. लग्नाला ग्लॅमर प्राप्त झाल्यामुळेच नियमांचा भंग होणे अगदी स्वाभाविक होते.