बिग बॉस मधून प्रसिद्ध झालेल्या महक चहल आणि अश्मित पटेल यांच्यात ब्रेकअप झाले आहे. याबाबत महक चहलने स्पष्टीकरण दिले आहे. एकमेकांबरोबर नाते असताना अनेक गोष्टी जुळून येणे आवश्यक असते. हे समर्पण, आपलेपणा आणि समविचारी असणे आवश्यक असते. मात्र एकमेकांबरोबर पाच वर्षे डेट केल्यावर सत्यस्थिती आपल्या लक्षात आली. त्यामुळेच हे नाते पुढे टिकू शकले नाही असे महक चहलने म्हटले आहे.
अश्मित पटेल हा काही आपल्यासाठी योग्य जोडीदार नव्हता, असेही तिने म्हटले आहे. दुसरीकडे अश्मित पटेलनेही आता महक चहल बरोबर आपले काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. ब्रेकअप नंतर आपल्याला आपल्या कुटुंबीयांनी आणि मित्रपरिवाराने खूप सहानुभूती दिल्याचे महकने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले आहे.
गेले वर्षभर ती गोव्यामध्ये राहत होती. तिथल्या वातावरणामुळे आपल्याला सावरायला मदत झाल्याचेही तिने सांगितले. महकने 2003 मध्ये “नई पडोसन’ नावाच्या सिनेमातून एन्ट्री केली होती. बिग बॉसमध्ये ती सर्वाधिक चर्चेत होती. 2009 मध्ये सलमानच्या “वॉन्टेड’मध्येही तिने काम केले आहे. आता “खतरो के खिलाडी-11′ मध्ये ती पुन्हा दिसणार आहे.