मुंबई – उत्तर भारतासह राज्यातही पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानातही घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
पुढील काही दिवस तापमानात घट होणार असून रात्री आणि सकाळी मुंबईत तापमान कमी राहणार आहे. यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहेत.
तसेच पुणे परिसरातील तापमान पुढील काही दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत पुण्यात हलके धुके पडण्याची शक्यता वर्तवली जात असून किमान तामानात 20 तारखेनतंर 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांगलादेशावर चक्रीवादळाचे क्षेत्र 3.1 किमीपर्यंत पसरल्यामुळे दक्षिणेकडील भागात कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे पुढील पाच दिवसात पुन्हा ढगाळ वातावरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंडीत वाढ होणार आहे.