मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट करुन या नवीन गाण्याबाबत माहिती दिली आहे. प्रसीद्ध गायक कैलाश खेर यांच्यासोबत त्यांनी हे गाणं गायलं आहे. ‘हे राम….’ असे गाण्याचे बोल आहेत.
श्री @Kailashkher जी के साथ @tipsofficial @BhaktiPrem1 म्युझिक के लिए ‘हे राम’ यह भजन गा कर सुखद आनंद की अनुभूती हुई। राममय भारतवर्ष में रामभक्ति पर गायनसेवा करने का मुझे यह सौभाग्य मिला है ।
इस भजन को सुनने के लिये ये लिंक क्लिक करिये 👉 https://t.co/vSkow1TPtbजल्द ही भजन… pic.twitter.com/rNN82pLNBa
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 19, 2024
“अमृता फडणवीस यांनी म्हंटेल की, संगीतासाठी ‘हे राम’ हे भजन गाऊन खुप आनंद झाला. राममय भारतवर्षात रामभक्तीपर गायन सेवा करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. हे भजन ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. https://lnk.to/6fcV4jPo – , या गाण्याचा व्हिडीओ लवकरच जारी होईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस यांचे यापूर्वीही अनेक गाणे प्रसारित झाले आहेत. चाहत्यांचा भरभरून प्रतिसादही त्या गाण्यांना मिळाला आहे. अमृता फडणवीस यांचं हे नवीन गाणं सध्या ऑडिओ स्वरुपात प्रसिद्ध झालं आहे. लवकरच ते व्हिडीओ स्वरूपात प्रसिद्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.