पुणे – पुण्यासह राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी होईल. त्यामुळे दोन दिवस थंडी तर दोन दिवस ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे.
दक्षिण व अग्नेय दक्षिणेकडून येणारे वारे राज्यात मध्य दक्षिण भागात येत असून, आद्रता घेऊन येत आहे. तर राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी असल्यामुळे पुढील दोन दिवसांत राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा जोर पुन्हा कमी होईल.
दरम्यान पुणे शहरात रविवारी (दि. 10) किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके होते. मात्र, हवेत गारवा आणि सकाळी धुके पडत असल्यामुळे थंडी चांगली जाणवत आहे. दिवसभर हवेत गारवा असल्यामुळे थंडी जाणवते. तसेच पुढील तीन दिवस शहरातील हवामान कोरडे राहील, सकाळी धुके पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.