कोळसा तस्करी प्रकरण : ममता बॅनर्जी यांच्या सुनेची होणार सीबीआय चौकशी

नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असून सीबीआयही ऍक्शनमध्ये आली आहे. कोळसा तस्करीमध्ये पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबातील नाव समोर आले आहे. ममता बॅनर्जींचा भाचे आणि टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजीरा नरूला यांची आज सीबीआय चौकशी करणार आहे. तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी रुजीरा यांची भेट घेतली.

कोळसा घोटाळ्यात व्यवहार, विदेशी खात्यामध्ये रक्कम आणि नागरित्व विवाद असे तीन आरोप रुजीरा बॅनर्जी यांच्यावर आहेत. याप्रकरणी सीबीआयने रविवारी रुजीरा बॅनर्जी यांना नोटीस पाठवली होती. यावर रुजीरा यांनी सीबीआयला पत्र लिहीत २३ फेब्रुवारी रोजी चौकशी करण्याची विनंती केली होती.

दरम्यान, सीबीआयने आज रुजीरा बॅनर्जी यांची चौकशी करणार आहे. तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी रुजीरा यांची भेट घेतली.

काय आहे प्रकरण? 

सीबीआयने २७ नोव्हेंबर २०२०मध्ये ईस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड ( ईसीएल)च्या अनेक अधिकारी, कर्मचारी आणि अनुप मांझी तसेच  सीआईएसएफ आणि रेल्वेच्या अज्ञात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. कोळसा घोटाळाप्रकरणी अनुप मांझी यांचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहे.

ईसीएल, सीआईएसएफ, रेल्वे आणि संबंधित अन्य विभागांचे अधिकाऱ्यांनी एकत्रपणे ईसीएलच्या लीजहोल्ड क्षेत्रातून कोळशाची चोरी आणि तस्करी केल्याचा आरोप आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.