पुणे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देशात सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवामुळे शिंदे हे त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांच्या घरी गणपतीचे दर्शन घेत आहेत. एकनाथ शिंदे यांचा नाना पाटेकर यांच्या भेटीचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे.
नाना पाटेकर यांच्या घराच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी बराच वेळ नानासोबत गप्पा मारल्या. यावेळी नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्र्यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले. त्यावर मुख्यामंत्र्यांनी देखील ‘एकदम निसर्गाच्या सानिध्यात’ असं म्हणत नानांचे कौतुक केले. तसेच घराशेजारी असलेल्या नानांच्या बागेत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वृक्षारोपण केले. आणि त्यानंतर तब्बल सव्वा तास दोघांमध्ये गप्पा रंगल्या. निघण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी नानाच्या घरी जेवणाचा आस्वाद देखील घेतला.
View this post on Instagram
मुख्यमंत्र्यांच्याबरोबर यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री विजय शिवतारे आदी मान्यवर देखील उपस्थित होते. सोशल मीडियावर या भेटीचे फोटो चांगलेच व्हायरल होताहेत. नाना पाटेकर यांचा साधे राहणीमान पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करताहेत.