CM Kejriwal arrested by ED : हायकोर्टाने अटकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचे पथक सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. यानंतर दिल्लीतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. यानंतर अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली.
सुमारे 2 तासांच्या चौकशीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर तपास यंत्रणा गुरुवारी संध्याकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचली होती. | CM Kejriwal arrested by ED
त्यापूर्वी, दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल म्हणाले की, सीएम केजरीवाल यांना अटक झाल्यास सरकार तुरुंगातून चालवले जाईल. मुख्यमंत्री राजीनामा देणार नाहीत. | CM Kejriwal arrested by ED
हाय कोर्टात काय झालं ?
अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला होता. ईडीच्या अटकेतून केजरीवाल यांना दिलासा मिळू शकलेला नव्हता. दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आणि म्हटले होते की या टप्प्यावर आम्ही अंतरिम दिलासा देण्यास तयार नाही. मात्र, न्यायालयाने या नवीन अंतरिम याचिकेवर ईडीकडून उत्तर मागितले आणि या प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र त्यानंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. | CM Kejriwal arrested by ED