पुणे – मागील आठवडाभरात पुण्यातील थंडी वाढत आहे. मात्र, शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली. त्यामुळे थंडीचे प्रमाण काहीसे घटले.
राज्यात मागील 24 तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
कोकण-गोव्याच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
शुक्रवारी शहरात 30.6 अंश सेल्सियस कमाल तापमान आणि 15.3 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे.