पुणे – पुणे ते सासवड रोड स्थानकांदरम्यानचे रेल्वे फाटक क्रमांक 4 देखभाल-दुरुस्तीकरिता दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या कालावधीत वाहनचालकांनी अन्य मार्गांचा वापर करत सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे विभागातील सासवड रस्त्यावरील मोहंमदवाडी गेट (किलोमीटर क्रमांक 7/5-6) तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी दि. 26 रोजी सकाळी 7 ते दि. 27 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत वाहनचालकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात काळेपडळ रोड येथील फाटक क्रमांक 8 चा वापर करावा, असे प्रशासनाने नमूद केले.