500 कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता

पुुणे – महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, येरवडा कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. तिरुपती पांचाळ यांच्या नियंत्रणाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षण संजय घावटे, अनिल डमाले, आरोग्य निरीक्षक अमोल म्हस्के, संदीप पवार, मयूर मांढरे, स्वप्नील कुताळ, मनोहर उभे, प्रमोद उकिरडे, अर्चना सोनवणे रुपाली शेंडगे, मोकादम आण्णा रास्ते, संदीप कुंटे, अगंत गायकवाड, सुरेश उबाळे, सुरेखा वाघमोडे, निसार शेख, निर्मलकुमार कांबळे, शरद देशमुख, विजय वालहेकर, जाधव, केंगले, बुरुटे यांनी सुमारे 500 कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोपखेतपासून, विश्रांतवाडी व येरवडा परिसरातील रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता केली.

दोन्ही पालख्यांचे पुणेकरांनी उत्साहात आणि भक्‍तिभावाने स्वागत केले. पुढील दोन दिवस शहरातील वातावरण भक्तिमय राहणार असून सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पाणी, स्वच्छता, शौचालय तसेच राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पालखी विसाव्याबरोबरच शहरातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही वारी “हरीत, निर्मल वारी होवो’, तसेच शहरात यावर्षी भरपूर पाऊस पडो आणि पुणेकरांनी चांगले पाणी मिळावे हीच पांडूरंग चरणी प्रार्थना.
– मुक्‍ता टिळक, महापौर, पुणे


लाखो वैष्णवांचा मेळा आज पुण्यात भक्तिमय वातावरणात दाखल झाला. या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवांसह सर्व प्रकारचा व्यवस्था करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे “यावर्षी चांगला पाऊस होऊदे, शेतकरी बांधवांचे शिवार फुलुदे, पाण्याची समस्या संपूदे’ असे साकडे पांडुरंगाला घातले आहे. तसेच, चांगला पाऊस होण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला असून नागरिकांनीही त्यामध्ये सहभाग घ्यावा.
– सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.