हवाई दलाची 33 विमाने, हेलिकॉप्टर्स चार वर्षांत दुर्घटनाग्रस्त

नवी दिल्ली – मागील चार आर्थिक वर्षांत भारतीय हवाई दलाची 33 विमाने आणि हेलिकॉप्टर्स दुर्घटनाग्रस्त झाली. त्यामध्ये लढाऊ जातीच्या 19 विमानांचा समावेश आहे. याबाबतची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

2015-16 या वर्षात 4 लढाऊ विमानांना अपघात झाला. पुढील दोन वर्षांत अनुक्रमे 6 आणि 2 लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली. तर 2018-19 या वर्षात हवाई दलाने लढाऊ जातीची 7 विमाने गमावली. त्यामध्ये 27 फेब्रुवारीला पाकिस्तानबरोबरच्या संघर्षावेळी कोसळलेल्या मिग-21 विमानाचाही समावेश आहे. ते विमान धाडसी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी चालवले होते. चालू आर्थिक वर्षात एएन-32 हे विमान अरूणाचल प्रदेशात कोसळले.

Leave A Reply

Your email address will not be published.