पुणे(प्रतिनिधी) – बारावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनिला गुण वाढविण्याचे आमिष दाखवत शरीर सुखाची मागणी करणाऱ्या क्लार्कला न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात विनयभंग व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
अभिजित पवार त्याचे नाव आहे. त्याने ॲड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. केले. पीडित मुलीने या शिक्षकाच्या बोलण्याचे रेकॉर्डिंग केले. हे रेकॉर्डींग ऐकल्यावर संतप्त पालकांनी शिक्षकाला महाविद्यालयात गाठले. यानंतर त्याच्या तोंडाला काळे फासत पोलीस ठाण्यापर्यंत त्याची धिंड काढली.
पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी आवाजाचा नमुना घेण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. यास बचावा पक्षातर्फे ॲड. पुष्कर दुर्गे यांनी विरोध केला. आरोपी 20 तास पोलिसांच्या ताब्यात होता. त्या काळात ते आवाजाचा नमुना घेऊ शकले असते.
या प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजुर केला.