वॉशिंग्टन : मृत्यूनंतरचे जग कसे असते याबाबत जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमध्ये लोकांना उत्सुकता आहे. याबाबत विविध प्रकारचे दावे आणि प्रति दावेही केले जातात. आता नॉर्थ कॅरोलिनतील एका 50 वर्षे वयाच्या इसमाने आपण मृत्यूनंतरचे जग पाहिले आहे. असा दावा केला असून या जगाचे संपूर्ण वर्णन त्याने एका व्हिडिओमध्ये केले आहे. डेव्हिड हॅंझेल असे या इसमाचे नाव असून एका आजाराने ग्रस्त असलेल्या डेव्हिडचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली होती पण काही मिनिटानंतर तो शुद्धीवर आला या आपल्या तात्पुरत्या मृत्यूच्या कालावधीमध्ये आपण मृत्यूनंतरचे जग पाहिल्याचा दावा त्याने केला.
मृत्यू झाल्यानंतर देवदूतासारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती मला नेण्यासाठी आल्या आणि मी त्यांच्यासोबत चालत राहिलो पायाखाली जमीन नव्हती. मी आधांतरीच चालत होतो त्या दोन देवदुतांनी मला एका मोठ्या खोलीमध्ये नेले असे डेव्हिडने म्हटले आहे. हा प्रवास चालू असताना मी अत्यंत सुंदर आणि शांत असे आकाश पाहिले अशी माहितीही डेव्हिडने दिली आहे. या दोन देवदुतांनी नंतर मला अतिशय स्वच्छ शुभ्र आणि तेजस्वी अशा पांढऱ्या प्रकाशाकडे नेले तेथे अनेक अशा प्रकारचे देवदूत वावरत होते असे सांगून डेव्हिड म्हणतो, त्या देवदुतांपैकी एकाने डेव्हिडला मृत्यूनंतरचे जग असेच असते याची कल्पना दिली.
तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका तुमचा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा तुम्हाला असाच अनुभव येईल असा दावाही डेव्हिडने केला आहे. मृत्यू नंतरचे हे जग अनुभवत असताना डेव्हिंडने त्या जगामध्ये अतिशय भव्य अशा पांढऱ्या शुभ्र संगमरवरी इमारतीचाही उल्लेख केला आहे. ही भव्य इमारत म्हणजे स्वर्ग असावा असे डेव्हिडला वाटते पण हे संपूर्ण जग अनुभवण्यापूर्वीच डेव्हिड जागा झाला.
हा अनुभव घेतल्यानंतर माझे व्यक्तिमत्व संपूर्ण बदलून गेले मी माझ्यावर अन्याय केलेल्या किंवा माझ्याशी वाईट वर्तणूक ठेवली. त्या सर्वांना माफ करावे असे मला वाटले आणि मी त्या सर्वांना माफ करून टाकले आहे. तसेच कोणाचेही वाईट व्हावे ही भावनाच माझ्या मनातून निघून गेली आहे असेही आता डेव्हिड म्हणतो.