पुणे :- सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल) आंतर क्लब 7-अ-साईड फुटबॉल स्पर्धेत 7 व 9 वर्षाखालील गटात डायमंड डॅगर्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत चमकदार कामगिरी केली.
स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने आयोजित मोशी येथील सिटी स्पोर्ट्स अरेना येथील मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत ७ वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यात तेजस पाटील (१७ मि.), रेयांश कदम (२१ मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर डायमंड डॅगर्स संघाने मॅट्रिक मार्व्हल्सचा २-१ असा पराभव केला.
Mario Zagallo Demise : ब्राझीलचे महान फुटबॉलपटू ‘मारियो झगालो’ कालवश…
दुसऱ्या सामन्यात डायमंड डॅगर्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताज संघावर ५-१ असा विजय मिळवला. डायमंड डॅगर्स संघाकडून रेयांश कदम (५,११,१८ मि.) याने तीन गोल केले. ९ वर्षाखालील गटात डायमंड डॅगर्स संघाने मॅट्रिक मार्व्हल्सचा १-० असा तर, दुसऱ्या सामन्यात डायमंड डॅगर्स संघाने आदित्य ऑलस्टार्सचा १-० असा पराभव केला.