विजयपूरा – कर्नाटक येथे ९ ते १२ जानेवारी दरम्यान होत असलेल्या २८ व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या सायकलिंग संघाचे नेतृत्व पुरुष गटात पुण्याचा चिन्मय केवलरमाणी आणि महिला गटात अहमदनगरची प्रणिता सोमण करणार आहे.
बारामती येथे झालेल्या ४थ्या महाराष्ट्र राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा आणि पहिल्या निवडचाचणी स्पर्धेमधील कामगिरीवरुन राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवडण्यात आला.
सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष आणि कॅमचे संघटन सचिव प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखालील कॅम चे सचिव प्रा. संजय साठे, महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार सन्मानीत राष्ट्रीय पदक विजेती दिपाली पाटील व मिलींद झोडगे आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन्मानीत उत्तम नाळे यांच्या निवड समितीने हा संघ निवडला.
Asian Olympic qualifiers shooting : भारतीय नेमबाज वरुणसह ईशाने मिळवला पॅरिस ऑलिम्पिक कोटा…
महाराष्ट्रचा संघ पुढील प्रमाणे –
वेदांत पानसरे, श्रीनिवास जाधव, आशिष पवार, हूजेफा मुल्ला, मानसी महाजन, प्राजक्ता सूर्यवंशी, निकिता शिंदे, शिवाली प्रमोद जाधव, सिद्धेश घोरपडे, आर्यन मळगे, हरीश डोंबाळे, ओंकार गांधले, जुई नारकर, श्रावणी परीट, श्रावणी घोडेस्वार, आसावरी राजमाने, वीरेंद्रसिंह पाटील, विपलव मालपटे, अश्विन मर्ढेकर, सोएब मुलांनी, निहाल नदाफ, अपूर्वा गोरे, मनाली रत्नोजी, स्नेहल माळी, सृष्टी कुंभोजे, सुजाता वाघेरे, चिन्मय केवलरमानी (कर्णधार, पुणे), सूर्या थातू, सुदर्शन देवर्डेकर, सिद्धेश पाटील, यश थोरात, करण सोनी, प्रणिता सोमण (कर्णधार, अहमदनगर), ऋतिका गायकवाड, रणजीत घोरपडे, योगेश्वरी कदम, राधिका दराडे, प्रणव कांबळे, हनुमान चोपडे, मुस्तफा पत्रावाला, तेजस धांडे