नेवासा : स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील व माजी खासदार जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्याकडून विचारांची शिदोरी घेऊन लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेने नेवासा शहरात वाटचाल सुरू केली.
सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर कोटयवधीच्या ठेवी पतसंस्थेमध्ये ठेवण्यात आल्या. २० व्या वर्षात पदार्पण करतांना कोणताही डाग न लावता पतसंस्थेची चाललेली यशस्वी वाटचाल व घोडदौड ही कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे पतसंस्था ही कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गार युवा नेते उदयन गडाख यांनी काढले.
नेवासा येथील लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेने काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ जगताप होते. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष महंमद शेख टेलर, बाळासाहेब पाटील, विजय गांधी, संभाजीराव पवार, अॅड.काकासाहेब गायके, राजेंद्र चौधरी, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, लक्ष्मणराव जगताप, रम्हुशेठ पठाण, सोसायटीचे माजी अध्यक्ष दिलीपराव जामदार,पोपटराव जिरे,जनकल्याण पतसंस्था अध्यक्ष महेश मापारी, बाळासाहेब मुथा, राजेंद्र उंदरे उपस्थित होते.
पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नंदकुमार पाटील यांनी स्वागत केले. जेष्ठ संचालक विजय गांधी यांनी प्रास्ताविक केले. दिनदर्शिकेचे प्रकाशनप्रसंगी संचालक डॉ.भाऊसाहेब घुले, कडूबाळ देशमुख, बजरंग इरले, दीपक दुधे, विकास शेंडे, राम कदम, अण्णासाहेब जाधव, अतुल देशमुख, मच्छिंद्र जामदार, कैलास बोरुडे, नगरसेवक फारूक आतार, दिनेश व्यवहारे, अंबादास इरले, पोलीस उपनिरीक्षक संजूबाबा गायकवाड यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी,सभासद उपस्थित होते.