नगर जिल्हा विभाजन करणार : राम शिंदे

नागरिकांना गतिमान सेवा मिळण्यासाठी जिल्हा विभाजन आवश्‍यक

नगर: नगर जिल्ह्या क्षेत्रफळाने मोठा असून त्याचे कार्यक्षत्रेही मोठे आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून त्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर जिल्हा विभाजन केले जाणार असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, विधानसभा उपाध्यक्ष आमदार विजय औटी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री शिंडे पुढे म्हणाले की, प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने व नागरिकांना गतिमान सेवा मिळण्यासाठी जिल्हा विभाजन आवश्‍यक आहे. याबाबत असलेला विरोध आता कमी झाला आहे. कारण आता विरोध करणारे सरळ झाले आहेत. मुख्यालयाच्या बाबत देखील वाद राहीला नाही. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन निश्‍चत होणार असून, योग्य वेळी मुहूर्त सांगितला जाईल, असा विश्वास शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच अकरावी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहता कामा नये, यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. असे ही त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.