शिक्रापूर – दरेकरवाडी (ता. शिरूर) येथे गावातील सर्व नागरिकांचे थायरॉईड व तापमान तपासणी करत त्यांना येथे आरएसबी ट्रान्समिनिशन लिमिटेड कंपनीच्या वतीने साबणाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सरपंच प्रमिला दरेकर यांनी दिली आहे.
कंपनीच्या वतीने गावात गरजु व गरिब लोकांना एक वेळचे जेवण दिले जात आहे. यावेळी सरपंच प्रमिला दरेकर, माजी उपसरपंच हिरामण दरेकर, कंपनीचे विकास दौंडकर व प्रतिनिधी, आरोग्य सेविका कल्याणी दीक्षित यांचे सहकार्य मिळाले.