आबूधाबी – सलामीवीर मनदीप सिंग पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर कर्णधार लोकेश राहुल व ख्रिस गेल यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 4 गडी गमावून 185 धावा केल्या. वादळी खेळी करणाऱ्या गेलचे शतक मात्र केवळ एका धावेने हुकले.
Innings Break! A stupendous knock of 99 by Chris Gayle propels #KXIP to a total of 185/4 on the board.#RR chase coming up shortly. Stay tuned!#Dream11IPL pic.twitter.com/HoKKTsdbZo
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
हा सामना जिंकत प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी पंजाबला विजयाची आवश्यकता होती. त्यामुळे नाणेफेक कोणता संघ जिंकतो ते महत्त्वाचे होते. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी दिली व स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पंजाबने 20 षटकांत 4 गडी गमावून 185 धावा करत राजस्थानसमोर 186 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
पंजाबकडून लोकेश राहुलने 46(41), ख्रिस गेलने 99(63), निकोलस पूरनने 22(10) आणि ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 6 तर दीपक हुडाने नाबाद 1 धावा केली. राजस्थानकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्सने प्रतेय
संक्षिप्त धावफलक – किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 4 बाद 185 धावा. (लोकेश राहुल 46, निकोलस पूरन 22, ख्रिस गेल 99, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 6, दीपक हुडा नाबाद 1, जोफ्रा आर्चर 2-26, बेन स्टोक्स 2-32).