मुंबई: अभिनेता सोनू सूद याच्या मदतकार्याविषयी शंका उपस्थित करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘डिअर सोनू सूद, तू खूप चांगलं काम करत आहेस. राऊतांकडं लक्ष देऊ नकोस. आपल्याला रोगाशी लढायचं आहे. रोग्याशी नाही…’ चित्रा वाघ यांच्या या ट्विटमुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. इतक्या कडवट टीकेला आता संजय राऊत कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.