नवी दिल्ली – दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना देण्यात आलेला दिल्लीतील 12 जनपथ हा बंगला त्यांचे चिरंजीव खासदार चिराग पासवान यांनी ताब्यात घेतला आहे. या बंगल्यातून आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून हा बंगला सरकारने ताब्यात घेतला आहे.
या बंगल्यातून चिराग पासवान यांचे सामान बाहेर काढून तो ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारचे एक पथक आज तिकडे गेले होते. त्यांनी हा बंगला खाली करून घेतला आहे. केंद्रीय मंत्री या नात्याने रामविलास पासवान यांना हा बंगला देण्यात आला होता. तो बंगला केंद्रीय मंत्र्यांसाठी राखीव आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे खासदार चिरंजीव चिराग पासवान यांनी हा बंगला ताब्यात घेतला होता.
तो खाली करण्याची नोटीस त्यांना एक वर्षापुर्वीच पाठवण्यात आली होती. परंतु त्याला चिराग पासवान यांनी धूप घातली नव्हती. आपल्या वडिलांच्या निधनानंतर हा बंगला स्वत:च्याच ताब्यात ठेवण्यासाठी चिराग पासवान यांनी त्या बंगल्यात राम विलास पासवान यांचे बेकायदेशीर स्मारकही उभारले होते.