पिंपरी – ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पिंपरी चिंचवड केंद्रातून संक्रमण, पुणे या संस्थेच्या छिन्नमस्ता या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. तर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा या संस्थेच्या राजदंश या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २० नोव्हेंबर, २०२३ ते १३ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत एकूण २२ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून चंद्रकांत अत्रे, उमेश घलसासी, सुधाकर पाटील यांनी काम पाहिले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे पिंपरी चिंचवड केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे – बालगंधर्व संगीत रसिक मंडळ या संस्थेच्या सवाल अंधाराचा या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक यतिन माझिरे (नाटक-छिन्नमस्ता), द्वित्तीय पारितोषिक आकाश थिटे (नाटक- राजदंश). प्रकाश योजनेसाठी प्रथम पारितोषिक वैभव नवसकर (नाटक-छिन्नमस्ता), द्वितीय पारितोषिक- गौरव जोशी (नाटक- अंतराय), नेपथ्यीसीठी प्रथम पारितोषिक अश्लेषा दुर्गुळे (नाटक-तप्तपदी), द्वितीय पारितोषिक सिध्देश नवसे (नाटक छिन्नमस्ता). रंगभूषेसाठी प्रथम पारितोषिक प्रियंका माझिरे (नाटक छिन्नमस्ता), द्वितीय पारितोषिक सायली औंधकर (नाटक-निळे पसारे). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रतीक जाधव (नाटक-खोळकिळा) व सुरभी कुलकर्णी (नाटक-छिन्नमस्ता). अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे विद्या भागवत (नाटक- अपूर्णांक), चारुलता पाटणकर (नाटक-सवाल अंधाराचा), स्वरदा तरडे (नाटक-गिल्टी), पल्लवी भडकमकर (नाटक-अल्टर्स), पुनरवसु इंगळे (नाटक-मंत्रप्रिया), योगेश तपस्वी (नाटक-अपूर्णांक), मिलिंद कुळकणों (नाटक-संभवामी युगे युगे), समर सुयोग (नाटक-मोरुची मावशी), सुचेत गवई (नाटक- राजदंश), कनिक रास्ते (काय झाडी, काय डोंगर, काय हाटिल)