ज्ञानेश्वरी हरगुडे हिचा स्मार्ट बेंच प्रथम
तळेगाव ढमढेरे – श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे शिरूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या प्राथमिक गटात केंदूरच्या चैतन्य ताथवडे याच्या सोलर पंप तर सणसवाडीच्या ज्ञानेश्वरी हरगुडे हिच्या स्मार्ट बेंच या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती व श्री पांडुरंग विद्यामंदिर यांच्या वतीने 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
प्रदर्शनात उच्च प्राथमिक गट व माध्यमिक गटात तालुक्याच्या विविध शाळांमधून 154 प्रकल्प सादर करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटन व बक्षीस वितरणप्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, गटविकास अधिकारी महेश डोके, संस्थेचे अध्यक्ष निवृत्ती गवारे, सचिव हरिचंद्र गवारे, उपाध्यक्ष लव्हाजी लोखंडे, घोडगंगा कारखान्याचे संचालक सोपान गवारे, सरपंच शंकर धुळे, उपसरपंच प्रतिभा वाळके, जिल्हा परिषद सदस्य रेखाताई बांदल, कुसुम मांढरे, पंचायत समितीचे सभापती आरती भुजबळ, मोनिका हरगुडे, आरएसएसचे संभाजी गवारे, विस्ताराधिकारी बाळकृष्ण कळमकर, वंदना शिंदे, किसन खोडदे,
प्रमुख संभाजी भालेराव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, शिरूर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी ठुबे, गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष कल्याण कडेकर, दादासाहेब गवारे, संदीप गवारे, माजी सरपंच कॅप्टन लोभाजी आल्हाट, संस्थेचे संचालक काळुराम गवारे, लक्ष्मण गवारे, श्रीहरी गवारे, मनीषा गवारे, महादेव गवारे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबन गवारे, उपाध्यक्ष बापू पवार, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ, मुख्याध्यापक रामराव दौंडकर उपस्थित होते.
प्रदर्शनातील प्रकल्पांचेपरीक्षण आर. आर. बाबेल पी. आर. ताजने पी. बी. जोंधळे, व्ही. पी. मुंडे, पी. सी. शेटे यांनी केले.
मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अनिल साकोरे व प्रभाकर चांदगुडे यांनी केले. राहुल गवारे यांनी आभार मानले.
शिरूर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे- विद्यार्थ्याचे नाव शाळा व प्रकल्प: उच्च प्राथमिक गट (इयत्ता सहावी ते आठवी) प्रथम चैतन्य ताथवडे सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदूर: सोलर पंप, द्वितीय श्लोक धुमाळ स्वा. सै. कै. शंकरराव बा. डावखरे विद्यालय, पिंपळे हिवरे: संरक्षण यंत्रणा, तृतीय आदित्य पुणेकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे नं,१. हयुमोनारज रोबोट कार, माध्यमिक गट (नववी ते बारावी) प्रथम ज्ञानेश्वरी हरगुडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सणसवाडी : स्मार्ट बेंच द्वितीय, उत्कर्ष महाजन श्री संभाजी पलांडे पाटील प्रगती हायस्कूल,
मुखई : आग प्रतिबंधक रसायन, संयोग हंबीर श्री पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी : बहुउद्देशीय शेती प्रकल्प विज्ञान, प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात प्रथम दत्तात्रय चिकटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संविंदणे : माहिती क्रिया, द्वितीय बी इ गायकवाड श्री पांडुरंग विद्या मंदिर,विठ्ठलवाडी कोनांचे प्रकार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती गट प्रथम मोहम्मद बु-होज्युदि्दन आयशा बेगम उर्दू हायस्कूल, शिरूर : त्रिकोणमितीचा प्रयोग, द्वितीय पी. जी. चांदगुडे पांडुरंग विद्या मंदिर, विठ्ठलवाडी: वनस्पती व प्राणीपेशी प्रदर्शनाच्या प्रकल्पांचे परीक्षण प्रयोगशाळा परिचर/सहायक गट प्रथम इमरान खान आयशा बेगम उर्दू हायस्कूल शिरूर: व्हॅक्युम क्लिनर, द्वितीय अक्षय बाळासाहेब मदने श्री मल्लिकार्जुन विद्यालय,न्हावरे : मानवी शरीर रचना विज्ञान.