‘चिंगारी’ला मिळाले भांडवल

बेंगळूरु – भारत सरकारने आत्मनिर्भर धोरणाप्रमाणे चिनी ऍपवर बंदी घालून भारतात ऍप विकसनासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. वादग्रस्त टिकटॉकला यशस्वी स्पर्धा देणाऱ्या चिंगारीची लोकप्रियता वाढत आहे.

त्यामुळे या ऍपमध्ये मूल्यवर्धन करण्याचे ऍप विकसित करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित घोष यांनी सांगितले. हे ऍप उपयोगी आहे. त्याचबरोबर भविष्यात या ऍपचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो, हे गुंतवणूकदारांच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे आम्हाला गुंतवणूकदारांकडून विचारणा होत आहे. या आठवड्यात आम्ही 13 लाख डॉलरची गुंतवणूक स्वीकारली आहे, असे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीचा उपयोग मनुष्यबळ वाढविण्याकरिता केला जाणार आहे.

सध्या ऍपचा वापर लाखो भारतीय करीत आहेत. त्यांच्याकडून यामध्ये कोणत्या सुधारणा करायच्या यासंदर्भात माहिती मिळत आहे. त्या आधारावर आम्ही हे अधिक विकसित करणार आहोत. भारताबरोबरच हे ऍप परदेशातही प्रसिद्ध होईल. त्या दृष्टिकोनातून ऍप व्यापक करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे घोष म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.